|
Photo Credit : pinterest.com |
विष्णुच्या दशावतारातील दुसरा अवतार म्हणजे कुर्मावतार. हा अवतार जेथे झाला असे मानले जाते ते अल्मोडा हे उत्तराखंड राज्यातील शहर एक महत्त्वाचे शहर आहे. निसर्गसौंदर्याने परिपूर्ण असे हे शहर पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहे. कोशी व शाल्मली या नद्यांच्या मध्ये पर्वतावर वसलेले हे शहर अनेक मंदिरे, निसर्गदृष्ये यांनी परिपूर्ण आहे. फेसबुकचा संस्थापक मार्क झकेरबर्ग तसेच अॅपलचा संस्थापक स्टीव्ह जॉब्ज मनःशांतीसाठी ज्या निमकरोली बाबांच्या आश्रमात राहिले होते त्या निमकरोली बाबांचेही अल्मोडा हे अतिशय आवडते स्थळ. उन्हाळ्याच्या दिवसात ते येथे रहायला येत असत. त्याच्या भक्तांनी येथे प्रचंड मोठे हनुमान मंदिर उभारले आहे. या मंदिरात अन्य देवतांबरोबर निमकरोली बाबांची मूर्तीही स्थापन केली गेली आहे.
|
Photo Credit : pinterest.com |
अल्मोडापासून ३५ किमीवर जागेश्वरधाम हे ठिकाण असून येथे एकाच ठिकाणी २५० अतिप्राचीन मंदिरांचा समूह आहे. तसेच नंदादेवी मंदिरात दरवर्षी भाद्रपद अष्टमीला निघणारी देवीची पालखी पाहण्यासारखी असते. याशिवाय तेथे त्रिपुरसुंदरी, भैरवनाथ, रघुनाथ, महावीर, मुरली मनोहर अशी अनेक सुंदर मंदिरे आहेत. ब्राईट एन्ड कॉर्नरवरून दिसणारे सूर्योदय व सूर्यास्ताचे दृष्य डोळ्याचे पारणे फेडणारे आहे. दूरदूरवरून पर्यटक येथे आवर्जून येतात. कटारमल सूर्यमंदिराची भेट तर चुकवू नये अशीच. या मंदिर समुहात हिमालयातील तमाम देवी देवता एकत्र पूजा अर्चेसाठी येतात असा समज आहे. येथे सूर्याची मूर्ती पद्मासनात असून या मंदिराची वास्तूरचनाही वैशिष्ठपूर्ण आहे. सूर्याची मूर्ती १ मीटर उंचीची व १२ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. उपत हे स्थळही अतिशय रमणीय असून येथे ९ कोनांचे गोल्फ मैदान आहे.
No comments:
Post a Comment