गंगोत्री ते गोमुख- केवळ गंगेच्या विश्वासावर करण्याची यात्रा, TOUR OF GANGOTRI TO GOMUKH

TOUR OF GANOTRI TO GOMUKH
Photo Credit : pinterest.com
उत्तराखंडमधील गंगोत्री जमुनोत्री यात्रा भाविकांच्या दृष्टीने आतिशय महत्त्वाची यात्रा मानली जाते. गंगोत्री येथील गंगा मंदिर व जमुनोत्री येथील यमुना मंदिर आता खुली झाली आहेत व तेथे भाविकांच्या रांगा वाढू लागल्या आहेत. मात्र कांही जणांना केवळ गंगोत्रीचे दर्शन घेऊन समाधान वाटत नाही व त्यामुळे गोमुख म्हणजे गंगेच्या उगमाचे दर्शन घेण्यासाठी खडतर प्रवासाची तयारी केली जाते. गंगोत्री ते गोमुख हा मार्ग अवघा १८ किमीचा असला तरी अतिशय अवघड व चालताना थोडीशी चूक झाली तरी जिवावर बेतणारा आहे. हा सारा प्रवास खडकाळ पर्वतरांगातून आणि निर्मनुष्य भागातून होतो व गंगामैय्यावर विश्वास ठेवून भाविक ही मार्गक्रमणा करतात.

गोमुखला जाण्याअगोदर उत्तराखंड पर्यटन विभागाकडे नोंदणी करावी लागते. दररोज साधारण १५० जणांना परवानगी दिली जाते. शरीराची तयारी असेल तर १ दिवसांत हा प्रवास करता येतो अन्यथा दोन दिवस लागतात. प्रवासाला सुरवात केल्यानंतर दगडधोंडे, प्रचंड चढउतार, पाण्याचेओहोळ पार करत पहिला टप्पा येतो ९ किमीवर असलेल्या चिडबासा येथे. मध्ये कोणत्याही क्षणी पाऊस झोडपून काढू शकतो. मोठमोठ्या शिळा पार करून ही मार्गक्रमणा करावी लागते. चारबासा येथे विश्रांतीसाठी कांही सुविधा नाही.

पावसाने निसरडा झालेला रस्ता, दगडांमुळे पायाची चाळण, हातात काठी घट्ट पकडल्याने हाताला पडलेले घट्टे, ऑक्सिजन कमी असल्याने लागणारी धाप, मधूनच पाऊस, मधूनच उन, कडाक्याची थंडी आणि वादळी वारे यांना तोंड देत पुढे असलेल्या भोजवासाला पडाव टाकायचा. संपूर्ण रस्ताभर माणूस दिसेलच याची खात्री नाहीच. पण भोजबासाला गेल्यावर मात्र आश्चर्याचा धक्का बसतो. कारण येथे राहण्याची सुविधा आहे. गरमागरम चहा, जेवण आपल्यासाठी तयार असते. चिडबासा ते भोजबासा पर्यंत पाच किलोमीटरचे अंतर दम काढणारे. रस्ता नाहीच. आपणच आपला रस्ता तयार करायचा.

याचा पुढचा पडाव म्हणजे गोमुख. गोमुखाच्या अलिकडेच भाविकांना ५०० मीटरवर थांबविले जाते. पुढे जायचे असेल तर ते स्वतःच्या जबाबदारीवर जायचे. दोन तासाची वाटचाल त्यासाठी करावी लागते. आणि ग्लेशियर मध्ये असलेल्या गुहेसारख्या भागातून उगम पावणारी गंगा डोळ्याचे पारणे फेडते आणि यात्रा पूर्ण झाल्याने मन भरून येते. खडतर प्रवासानंतर मिळणारे हे समाधान खरेाखरच अत्यानंदाची परमावधी म्हणावे लागेल.
TOUR OF GANOTRI TO GOMUKH
Photo Credit : pinterest.com
TOUR OF GANOTRI TO GOMUKH
Photo Credit : pinterest.com
TOUR OF GANOTRI TO GOMUKH
Photo Credit : pinterest.com

No comments:

Post a Comment