आणि एकेकाळचे अतिश्रीमंत गाव बनले ओसाड, KOLMANSCOP VILLAGE

kolmanscop village

दक्षिण आफ्रिकेतील वाळवंटात एकेकाळी नांदतेगाजते व अतिश्रीमंत शहरांच्या यादीत असलेले कोलमॅसकॉप नावाचे शहर आता ओसाड बनले आहे. मात्र आजही या ठिकाणाला भेट देणार्‍यात फोटोग्राफर व पर्यटकांची संख्या प्रचंड आहे. साधारण १०० वर्षांपूर्वी वसलेले हे गांव हिर्यकयांच्या खाणींसाठी प्रसिद्ध होते मात्र येथील खाणीतील हिरे आता संपुष्टात आल्याने येथील नागरिक हे शहर सोडून गेले आहेत.

१९०८ साली येथे एका मजुराला अचानक एक दगड सापडला. हा साधा दगड नसून मौल्यवान हिरा असल्याचे उघड झाल्यानंतर येथे हिर्यरयांचे साठे असावेत हे लक्षात आले. त्यानंतर जर्मनीतून हजारो कुटुंबे येथे येऊन स्थायिक झाली व पाहता पाहता आफ्रिकेतील सर्वात श्रींमत शहरांत या गावाची गणना होऊ लागली. त्याकाळीही येथे हॉस्पिटल, शाळा, वीजकेंद्रे, कॅसिनो अशा सर्व सुविधा होत्या व मोठमोठ्या इमारतीही होत्या. पहिले जागतिक महायुद्ध झाले तेव्हा मात्र हे शहर हळूहळू उजाड होऊ लागले कारण येथील खाणीतून हिरे साठे संपत आले होते. त्यावेळी येथील नागरिकांना येंथून जवळच असलेल्या दुसर्‍या शहराकडे स्थलांतर केले.

आजही या शहरात कांही इमारती अजून उभ्या आहेत मात्र तेथेही सर्वत्र वाळू भरली आहे. आजही हजारो पर्यटक व फोटोग्राफर या शहराचा इतिहास व वर्तमान पाहण्यासाठी येथे आवर्जून येतात. अनेक चित्रपट, टिव्ही सिरीयल्स येथे शूट केल्या गेल्या आहेत. मात्र येथे कुणीही वस्तीला नसल्याने या शहराची गणना घोस्ट टाऊनमध्ये झाली आहे.

No comments:

Post a Comment