रिजनल पार्क मधील रिजनल पार्क, ETERNAL FLAME FALLS – CHESTNUT RIDGE REGIONAL PARK

ETERNAL FLAME FALL
Photo Credit : Pinterest
न्यूयार्कमधील चेस्टनट रिजनल पार्क मधील छोटासा धबधबा अमर ज्येात धबधबा किंवा इटरनल फ्लेम फॉल या नावाने प्रसिद्ध असून या धबधब्यामागे असलेले रहस्य खुले झालेले आहे. या धबधब्याच्या मध्येच एका कपारीत एक ज्योत जळताना दिसते. ही ज्येात अक्षय असल्याचे सांगितले जाते मात्र ते खरे नाही. कधीकधी ही ज्योत विझते पण त्याचवेळी तेथे गेलेले कोणी हायकर, ट्रेकर ती पुन्हा प्रज्वलित करतात. अर्थात पाण्याच्या मध्ये ज्योत हेच येथले सर्वात मोठे आकर्षण आहे.

हे स्थळ प्रामुख्याने उन्हाळी पर्यटन स्थळ आहे. १२१३ एकर परिसरात असलेले हे उद्यान हायकिग ट्रेलस, सायकलींग ट्रॅक, मैदाने, टेनिस कोर्ट, पर्यटकांसाठी विविध सुविधांनी युक्त असले तरी इटरनल फ्लेम धबधब्यापाशी मात्र पर्यटकांची फारशी गर्दी नसते. येथे जाताच कुजक्या अंड्यासारखा वास येऊ लागतो. हा वास धबधब्याच्या खडकांखाली असलेला व लीक होत असलेल्या नैसर्गिक गॅसचा आहे. या धबधब्यात एक गुहेसारखा भाग असून याच्या आत गॅस लिक होतो तेथेच ही फ्लेम पेटते. गुहेप्रमाणे कपार असल्याने या ज्योतीला आपोआपच पाणी व वार्‍यापासून संरक्षण मिळते.

हा धबधबा उन्हाळ्यात बर्फ वितळत असल्याने वाहू लागतो. खूप पाऊस झाला तरी तो वाहतो. कधीकधी त्याची उंची ३० फुटांपर्यंतही वाढते. पाच फुट उंचीच्या मधल्या गुहेत ही ज्योत गॅस किती लिक होतो त्यानुसार लहान मोठी होते. कधीकधी ती चार ते ८ इंचांपर्यंतही दिसते. पाण्याचा वेग फार वाढला तर ही ज्योत कधीकधी विझते. पृथ्वीवर या प्रकारचा हा एकमेव धबधबा असल्याचे सांगितले जाते.
ETERNAL FLAME FALLS
Photo Credit : Pinterest
ETERNAL FLAME FALLS
Photo Credit : Pinterest

No comments:

Post a Comment