![]() |
Photo Credit : i.ytimg.com |
अंटार्टिकातील टेलर ग्लेशियरच्या वेस्ट लेक बोनी मधून निघणार्या एका धबधब्याचे पाणी रक्तासारखे लाल आहे व त्यामुळेच त्याला ब्लड फॉल असे म्हटले जाते. अंटाटिकाच्या शुभ्र बर्फाच्छादित प्रदेशातून वाहणारा व पाच मजली इमारतीच्या उंचीचा हा धबधबा जगातील एक आश्चर्य मानले जात असले तरी येथे पर्यटकांची फारशी गर्दी होत नाही. यामागचे मुख्य कारण म्हणजे या धबधब्यात आत्म्यांचा निवास आहे व येथे भेट देणार्या पर्यटकांना ते ठार करतात व म्हणूनच येथील पाण्याचा रंग रक्तासारखा लाल आहे अशी धारणा आहे.
![]() |
Photo Credit : keywordsking.com |
या ग्लेशियरचा शोध १९११ मध्यें अमेरिकन जैववैज्ञानिक ग्रिफिथ टेलर याने लावला. या ब्लड फॉलमध्ये १७ प्रकारचे सूक्ष्म जीव असल्याचेही त्याने शोधले तसेच या धबधब्याखालचे सरोवर गोठलेले असते व त्याला भेगा पडलेल्या असल्याने तेथे पाणी हळू वाहते. या पाण्यात मोठ्या प्रमाणात असलेल्या आयर्न कणांचा हवेशी संपर्क येतो व त्यामुळे लाल रंगाचे आयर्न ऑक्साईड बनते व त्याचा परिणाम म्हणून हे पाणी लाल रंगाचे दिसते असेही त्याने सिद्ध केले आहे.
No comments:
Post a Comment