हा आहे जगातील सर्वात उंच झोका, WORLDS HIGHEST CANYON SWING

WORLD HIGHEST CANYON SWING
Photo Credit : pinterest.com
झोक्यावर झुलल्याने एक प्रकारचा थ्रील अनुभवायला मिळतो. अनेक जन झुलायला आवडत असल्याने घरीच झोका तयार करतात. तर काही लोक जत्रेमध्ये जाऊन झोक्याचा आनंद घेतात. गावामध्ये झाडाला बांधून तर शहरामध्ये घराच्या छताला बांधून झोक्याचा आनंद घेतला जातो. जास्तीत जास्त १० ते २० फुटांचा हा झोका असतो. तर जत्रेमधील झोका हा साधारणतः ५० ते १०० फुटांचा असतो. पण एक असा झोका अमेरिकेत आहे ज्याची उंची ऐकून तुम्हाला घाम फुटेल. तब्बल १३०० फुट ऐवढी या झोक्याची उंची आहे. हा जगातील सर्वात उंच झोका मानला जातो.

अमेरिकेच्या कोलेरॅडो प्रांतातील ग्लेनवू स्प्रिंगमधील ऍडव्हेंचर पार्कात हा झोका आहे. तसे अनेक झोके या पार्कमध्ये आहेत. पण येथील सर्वात प्रसिद्ध असा झोका आहे, ज्याची उंची तब्बल १३०० फूट आहे. एका डोंगरावर असलेला जगातील हा सर्वात उंच झोका दूरवरून नजरेस पडतो. हवा आणि वायूच्या दबावामुळे ताशी ८० किलोमीटरच्या गतीने हा झोका चालतो. त्याच्या आवर्तनातून ११५ अंशाचा कोन तयार होतो. या झोक्यावर एकावेळी अनेक लोक झुलण्याची मजा घेऊ शकतात.

या पार्कच्या मालकाचे नाव स्टीव बेकले असे आहे. ते म्हणतात की ज्यावेळी तुम्ही या १३०० फूट झोक्यावर झुलत असता तेव्हा खाली १ फूटावरचा नजारा पाहून साहजिकच कुणाचेही डोळे फिरू शकता. आपल्या या उपक्रमाकडे लोक फारसे आकर्षित होणार नाहीत असे या सगळ्य़ात उंच झोक्याची रचना करणार्‍या स्टीव याला सुरुवातीस वाटले होते, पण त्याला जसा प्रतिसाद मिळत आहे ते पाहून तोही थक्क झाला आहे. खरेतर तिथे रोलर कोस्टर साकारण्याची स्टीवची योजना होती, मात्र लोकांना काहीतरी वेगळे देण्याच्या विचारातून ही कल्पना त्याला सुचली. या अँडव्हेंचर पार्कमध्ये स्वीमिंग, क्लायबिंग आणि गुहांतील सफरीचाही आनंद घेतला जाऊ शकतो.
WORLD HIGHEST CANYON SWING
Photo Credit : pinterest.com

No comments:

Post a Comment