|
Photo Credit : wikimedia.org |
नेत्रदीपक दगडांमध्ये कोरण्यात आलेल्या नक्षीकामासाठी सौदी अरेबियातील मादाइन सालेह हे प्राचीन शहर ओळखले जाते. नाबाटेअन या शहरात राहायचे. त्यांच्याबद्दल जास्त माहिती मिळाली नसती तरी ही जमात प्रतिभासंपन्न होती, असे म्हटले जाते. या शहराच्या वास्तुंनी अत्यंत सुशोभित मंदिरे व थडग्यांमुळे जगभरात नावलौकिक मिळविले आहे.
|
Photo Credit : wikimedia.org |
या जागेचे युनेस्कोनो पुनरुत्थान केले नसते तर ही जागा संपूर्ण जगासाठी अज्ञातच राहिली असती. या जागेला युनेस्कोने जागतिक वारसेचा दर्जा दिला आहे. येथे पोहोचणे वाटते तितके सोपे नव्हे. प्रवाशांना पहले रियाध, सौदी अरेबियाला जावे लागते नंतर मेडिना तेथून पुन्हा चार तासाचा प्रवास करुन मग मादाइन सालेह येथे प्रवाशी पोहोचू शकतात.
No comments:
Post a Comment